Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत

केज प्रतिनिधी - केज शहरातील महात्मा फुले नगर येथील राहुल वहावळे यांच्या निवास स्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी

नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत  श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
पोलिस शिपायाचा महिलेवर बलात्कार
बावनकुळे यांच्या जुन्या मतदारसंघात खापा आणि गुमथी दोन्ही ठिकाणी भाजप विजयी 

केज प्रतिनिधी – केज शहरातील महात्मा फुले नगर येथील राहुल वहावळे यांच्या निवास स्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सदिच्छा भेट दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांचा मराठवाडा दौर्‍यानिमित्त बीड वरून उस्मानाबाद कडे जात असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचीत जातीचे प्रदेशसरचिटणीस राहुल वहावळे यांच्या फुलेनगर येथील निवास स्थानी कुणाल राऊत व त्यांच्या सहकार्‍यांचे आगमन होतच राहुल वहावळे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
यावेळी राहुल वहावळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कुणाल राऊत यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.काँग्रेसचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यासमवेत राहुल वहावळे यांनी विविध विषयावर चर्चा केली.यावेळी काँग्रेसचे राहुल वहावळे,लोकसभा उपाध्यक्ष तथा बोडखा गावचे सरपंच अशोकराव तिडके,परळी विधानसभा उपाध्यक्ष रणजीत हारे,अविनाश सरवदे, भागवत गव्हाणे,अनिल डोंगरे,पत्रकार तात्या गवळी,नितीन धिवार, बालासाहेब जोगदंड, सुदेश शिरसट,सुशील रोकडे,मेजर सदाशिव मस्के,प्रेम मस्के,कल्याण घोडके,अशोकगायकवाड, धीवार सर,आकाश शिंदे आणी राहुल वहावळे यांचा परिवार यांच्यासह महात्मा फुले नगर येथील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS