गेवराई प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत स्वाभिमानी शेत

गेवराई प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे हमाल व तोलारी मतदार संघातील उमेदवार कृष्णा प्रभाकर राऊत हे बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपा पुरस्कृत पॅनलच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान बाद ठरले होते, आज या मतदार संघातील अन्य उमेदवार नारायण भुंबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कृष्णा राऊत यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. कृष्णा राऊत यांनी अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या विजयी सलामीचे जल्लोषात स्वागत केले.
गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या विरोधात भाजपा आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी आमदार बदामराव पंडित यांनी युती करुन पॅनल उभा केला आहे. शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन गेवराई तालुक्यातील जनतेला धक्का दिला. आजवर एकमेकांवर राजकीय टिका करणारे प्रतिस्पर्धी एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजी-माजी आमदार एकत्र येवुनही त्यांना अमरसिंह पंडित यांच्या पॅनल विरोधात सक्षम उमेदवार देण्यात अपयश आल्याचे निवडणुकीच्या पहिल्या टप्यात दिसुन येत आहे. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार कृष्णा प्रभाकर राऊत हे हमाल-तोलारी मतदार संघातुन बिनविरोध विजयी झाल्याचे आज जाहिर करण्यात आले. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्राच्या छाननी दरम्यान भगवान किसन कानगुडे यांच्या नामनिर्देशन पत्रातील सुचक व अनुमोदकांनी उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली नसल्याचे शपथपत्रासह निवडणुक निर्णय अधिकार्यासमोर हजर होवुन अक्षेप नोंदविला, बनावट स्वाक्षर्यांच्या आधारे दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकार्यांनी बाद ठरविला. याच मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत दुसरे उमेदवार भुंबे नारायण गंगाराम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार कृष्णा प्रभाकर राऊत यांना निवडणुक निर्णय अधिकार्यांनी बिनविरोध विजयी घोषीत केले. यावेळी सरपंच सुरेश ढवारे, बाबासाहेब गव्हाणे, रुस्तुम बेदरे, संजय राऊत, संदिपान पट्टे, सोमनाथ राऊत, दादाभाऊ सकार्डे, दादा माळी, दत्ता गव्हाणे, विठ्ठलराव राऊत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
COMMENTS