Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच

येरवड्यात तरुणावर वार, चार अल्पवयीन ताब्यात

पुणे : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल

अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर (Video)
पतीला सोडून शिक्षिका पत्नी मुख्याध्यापकासह फरार
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

पुणे : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच रिक्षाच्या काचा फोडल्या. आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अब्दुल अमीरउल्ला खान (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार अल्पवयीन मुले आणि खान हे एकाच भागात राहायला आहेत. दरम्यान ते फुटबॉल खेळत असतांना त्यांच्यात वाद झाले होते.  दरम्यान काल रात्री, खान आणि त्याचे मित्र, महेश मिश्रा, आयुष दुचाकीवरुन येरवडा येथून जात असतांना चार अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवले. काही कळायच्या आत चौघांनी खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. तसेच येथील दोन रिक्षांच्या काचा त्यांनी फोडल्या. यानंतर त्यांनी परिसरात दहशत माजवत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चारही आरोपींना अटक केली आहे.

COMMENTS