Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

10 जणांच्या टोळक्याकडून भररस्त्यात तिघांवर कोयत्याने वार

पुणे ः पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचे नाव घेत नाही आहे. त्यात कोयते घेऊन विविध परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार तर सुरुच आहे. त्यातच आता पुण्यात

केज येथील दोन विधीज्ञा वर पुण्याच्या कोयता गँगचा हल्ला
पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ

पुणे ः पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचे नाव घेत नाही आहे. त्यात कोयते घेऊन विविध परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार तर सुरुच आहे. त्यातच आता पुण्यातील तरुणांवर तलवार, कोयत्याने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा सीसीटिव्हीदेखील समोर आला आहे. ही घटना पुणे- पानशेत रस्त्यावर गोर्‍हे बुद्रुक गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे गोर्‍हे बुद्रुक गावाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा हल्ला भररस्त्यात करण्यात आला आहे. रस्त्यावर इतर लोकांची ये-जा सुरू आहे. मात्र, गुंडांना याची कसलीही भीती दिसली नाही. या टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांनी जखमी केलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. नेमका हा हल्ला टोळी युद्ध आहे का पूर्व वैमनस्यातून केला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येणार आहे. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास हवेली पोलिस करत आहे. दरम्यान, पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी काही पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांची परेड घेतली होती. तसेच त्यांना तंबी देखील दिली होती. मात्र, असे असतांनाही पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरूच आहे. येरवडा येथे देखील काही तरुणांनी हातात कोयते घेऊन काही गाड्यांची तोडफोड केली होती. यानंतर गोहे बुद्रुक येथे झालेल्या या हल्ल्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

COMMENTS