Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला

पुणे ः पुण्यातील कोयता गँगची दहशत सुरुच असून, या कोयता गँगेने कात्रज परिसरात दिवसाढवळ्या तरूणाचा पंजा मनगटापासून वेगळ्या केल्याची घटना उघडकीस आली

सातार्‍यातील युवकास खून प्रकरणात जन्मठेप
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का
एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो- राज ठाकरे

पुणे ः पुण्यातील कोयता गँगची दहशत सुरुच असून, या कोयता गँगेने कात्रज परिसरात दिवसाढवळ्या तरूणाचा पंजा मनगटापासून वेगळ्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील कात्रज भागात दिवसाढवळ्या कोयता गँगच्या टोळीने या तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुणाचा मनगटापासून पंजा तुटला. सुदैवाने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पुन्हा जोडला गेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहा जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पुण्यातील हडपसर, मांजिरी, सिंहगड रोड, नवी पेठ आणि येरवडा या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. प्रशासनानं कठोर पावलं उचलल्यानंतरही कोयता गँगचे काही हल्ले काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

14 वाहनांची तोडफोड – पुण्यात एका तरुणाचा धारदार शस्त्राने पंजा तोडल्यानंतर त्याच्या मित्रांनी कोंढवा परिसरातील टिळेकरनगर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशी एकूण 14 वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे.

COMMENTS