श्रीगोंदा : तालुक्यातील कोरेगव्हाण येथे जलजीवन योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विनायक इधाटे, ईश्वर आढाव, राजू कातोरे व ऍड. संपतराव इधाटे यांनी २३ फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी पंचायत समिती श्रीगोंदा, आस्थापना-१ विभागाकडून संबंधित कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून दि. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनास शशिकांत शिर्के, तुकाराम आढाव, संतोष सुरवसे, नक्षत्रा ताडे, स्वप्नील लोखंडे, पप्पू दळवी, शीतल ताई गोरे (निर्भय महाराष्ट्र पक्ष), पत्रकार अनिल ठवाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे आदींचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे कोरेगव्हाणसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

श्रीगोंदा : तालुक्यातील कोरेगव्हाण येथे जलजीवन योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विनायक इधाटे, ईश्वर आढाव, राजू कातोरे व ऍड. संपतराव इधाटे यांनी २३ फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
या प्रकरणी पंचायत समिती श्रीगोंदा, आस्थापना-१ विभागाकडून संबंधित कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून दि. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनास शशिकांत शिर्के, तुकाराम आढाव, संतोष सुरवसे, नक्षत्रा ताडे, स्वप्नील लोखंडे, पप्पू दळवी, शीतल ताई गोरे (निर्भय महाराष्ट्र पक्ष), पत्रकार अनिल ठवाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे आदींचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे कोरेगव्हाणसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS