Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ः मुख्याधिकारी जगताप

Oplus_131072 कोपरगाव शहर ः  शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवार 13 मे रोजी मतदान असल्याने कोपरगाव शहरात भरणारा सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणा

युवराजांचा बालिशपणा समजू शकतो, पण ज्येष्ठ नेते तुम्ही सुद्धा !
तरुणीवर अत्याचार करून पैशांसाठी धमकावले, गुन्हा दाखल
अहमदगरला 202 तलाठी पदांसह 34 महसूली मंडळाला मान्यता
Oplus_131072

कोपरगाव शहर ः  शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवार 13 मे रोजी मतदान असल्याने कोपरगाव शहरात भरणारा सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली आहे.
या विषयी मुख्याधिकारी जगताप यांनी कोपरगाव शहरातील आठवडे बाजारातील भाजी, फळ, किराणा, रेडीमेड, कापडे व इतर अनुषंगिक व्यापारी यांना कळविले आहे की, 38-शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये सोमवार दि.13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने ज्या गावांमध्ये मतदानाचे दिवशी म्हणजे सोमवार दि.13 मे 2024 रोजी आठवडे बाजार आहे, अशा ठिकाणचे बाजार बंद ठेवणेकामी मा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी, भाग शिर्डी यांचे दि.10 मे 2024 रोजी आदेश प्राप्त झालेले आहे. सदरील आदेशानुसार मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दृष्टीने सोमवार दि.13 मे 2024 रोजी कोपरगाव शहरात भरत असलेला आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्व आठवडेबाजार विक्रेते यांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.

COMMENTS