Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने टाकला नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार

सफाई कामगारांचे मोठे योगदान ; नगराध्यक्ष कदम
25 तलाठी कार्यालयांसाठी 5.33 कोटींची निविदा प्रसिद्ध
लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवून दाखवावी : माजी मंत्री प्रा. राम शिंदे
कोपरगाव/प्रतिनिधीः शालाबाह्य अनियमित स्थलांतरित विद्यार्थी सर्वेक्षण व नवभारत साक्षरता सर्वेक्षण या शाळाबाह्य कामाविरुद्ध कोपरगाव तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकण्याचे निवेदन कोपरगाव गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख यांना देण्यात आले.
 निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ऑगस्ट महिन्यात विद्यालयांमध्ये घटक चाचण्या, शिष्यवृत्ती परीक्षा ,एन.एम.एम.एस परीक्षा,चित्रकला ग्रेड परीक्षा आदी स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरणे, शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती भरणे, सरलचे काम करणे, युडायस प्लसची माहिती भरणे.तसेच अनेक शिक्षक बी.एल.ओ.च्या कामाकरिता नियुक्त केलेले आहे.अनेक दिवसांपासून शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत असा सर्व एकंदरीत विचार करता शिक्षकांवर अगोदरच अतिरिक्त कामाचा कार्यभार असताना देखील शासनाने नव्याने नवभारत साक्षरता सर्वेक्षण करण्यासाठी याच कालावधीत परिपत्रक काढलेले आहे.त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा अधिक भार पडणार आहे. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी तसेच शाळा सुटल्यानंतर करण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षक शाळेत काम करताना सकाळपासून विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांचे जादा तास ,इयत्ता दहावीचे जादा तास असतात. मग हे सर्वेक्षण करायचे कधी..? तालुक्यात महिला शिक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करून कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने या सर्वेक्षण कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. या निवेदनावर कोपरगाव तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या स्वाक्षरी आहेत. हे निवेदन देण्यासाठी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव मकरंद कोर्‍हाळकर, कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ,सचिव भगवान शिंदे ,अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव अरुण बोरणरे, मुख्याध्यापक सुनील बागल, कोपरगाव तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कोपरगाव तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष नितीन निकम, जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ लव्हाटे, संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अतुल कोताडे, ललित जगताप,नितीन बारगळ, सहसचिव पवन सांगळे, खजिनदार सुनील वाघमारे,राजेंद्र बाविस्कर, जिल्हा प्रतिनिधी दिनेश चव्हाण ,उमेश पवार, सोमनाथ गायकवाड, किरण चांदगुडे ,शहाजी सातव, प्रकाश टपळे, कैलास बनसोडे, बाबुराव साबळे, रयत बँकेचे संचालक दीपक भोये, प्रल्हाद गांगुर्डे, प्रवीण बोराडे, सिताराम झुराळे, शिक्षकेतर प्रतिनिधी कमलेश गायकवाड,राजेंद्र भामरे ,सतीश मेंढे, तुकाराम देवकर, होन,दत्तात्रय शिंदे ,महारुद्र चव्हाण, जनार्दन खेताडे , गणेश आमरे, गणेश देशमुख, सुनील पिंपळे आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS