Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी प्रा. पाटील तर प्रसिद्धीप्रमुखपदी लोकमंथनचे प्रा.विजय कापसे

कोपरगाव प्रतिनिधी ः शासनमान्य शिक्षक भारती शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागाची नुकतीच उच्चमाध्यमिक विभागाचे  जिल्हा

सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर
दूधगंगा सहकारी पतसंस्थेत 80 कोटींचा आर्थिक घोटाळा
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक

कोपरगाव प्रतिनिधी ः शासनमान्य शिक्षक भारती शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागाची नुकतीच उच्चमाध्यमिक विभागाचे  जिल्हाध्यक्ष प्रा. रामराव काळे, सरचिटणीस प्रा. महेश पाडेकर व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रा. अमोल चंदनशिवे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक होऊन या बैठकीत कोपरगाव तालुकाध्यक्षपदी श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्रा.योगेश पाटील यांची  एकमताने निवड करण्यात आली आहे. सचिवपदी पोहेगाव जुनिअर कॉलेजचे प्रा नरेंद्र लहिरे, सहसचिवपदी एस एस जी एम कॉलेजचे प्रा बाबासाहेब पवार तर प्रसिद्धीप्रमुखपदी कमलाताई बाळासाहेब सातभाई ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विजय कापसे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
  सर्व नवनियुक्त कोपरगाव तालुका पदाधिकार्‍याचे शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील, राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके, कोकण विभागाचे अध्यक्ष धनाजी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्यअध्यक्ष आर.बी.पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष रामराव काळे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप ,उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, सचिव महेश पाडेकर, महिला राज्य अध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे यांच्या सह संदीप तोगे, माफीज इनामदार,योगेश देशमुख, चंद्रशेखर हासे,संपत वाळके, संजय भालेराव, गणपत धुमाळ,कैलास रहाणे, सुशांत सातपुते,रूपाली बोरुडे,उषा मिसाळ, सचिन लगड, श्याम जगताप, संजय तमनर,चंद्रशेखर हासे, प्रवीण मते,दादासाहेब कदम, संतोष निमसे, मारुती कुसमुडे ,मनोहर राठोड,प्रवीण आहेर,सोमनाथ खाडे अमोल वरपे,हर्षल खंडीझोड,संदीप तोगे,बाबासाहेब चौधरी,  जालिंदर पटारे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्‍चंद्र पंडित, नितीन शिरसाट, नितीन बिरारी, श्रीधर दिवटे, सुनील चव्हाण, सचिन काशिद आदी पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS