कोपरगाव शहर प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2022 आरक्षण सोडत सोमवार दि 13 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका कार्यालयात नियंत्रक
कोपरगाव शहर प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2022 आरक्षण सोडत सोमवार दि 13 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका कार्यालयात नियंत्रक तथा प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन अहमदनगर बालाजी क्षीरसागर यांचे अध्यक्षतेखाली तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदीं सह कोपरगाव नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सह शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
येणारी कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकित 2011 च्या जनगणनेनुसार 15 प्रभाग असणार असून या प्रत्येक प्रभागात प्रत्येकी दोन उमेदवार असे एकूण 30 उमेदवार निवडले जाणार असून त्यात 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार असून या आरक्षण सोडतिचा कार्यक्रम नगरपरिषद शिक्षण मंडळ प्राथ शाळा क्रमांक-4 च्या मदिहा तेहरीम मूनशिर खान, सारा हरून शेख, सिद्धीक हरून शेख, झारा बिलाल शेख व आइशा सिराज शेख या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्या टाकून प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.
आरक्षण सोडत प्रभागनिहाय
प्रभाग क्र-1 टाकळी रोड जागा-1-सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 2 सप्तश्रृंगी जागा-1- अनुसूचित जाती (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 3 सिद्धिविनायक जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 4 तुळजाभवानी जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 5 साई जागा-1- अनुसूचित जमाती जागा-2- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र- 6 अंबिका जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 7 छत्रपती शिवाजी महाराज जागा-1-सर्व साधारण महिला (महिला)
जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 8 लक्ष्मीमाता जागा-1- अनुसूचित जाती (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 9 भगवती माता जागा-1- अनुसूचित जाती जागा-2- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र- 10 वरदविनायक जागा-1-सर्व साधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 11- श्रीराम जागा-1- अनुसूचित जाती (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 12- माता वैष्णवदेवी जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 13-गोदावरी जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 14 संत गोरोबाकाका जागा-1- सर्व साधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 15 शुक्राचार्य जागा-1- अनुसूचित जाती जागा-2- सर्वसाधारण (महिला)
COMMENTS