कोपरगाव : सहकार कृषी क्षेत्रात अग्रणी तालुका म्हणुन कोपरगावची राज्यात वेगळी ओळख आहे.सहकारातून उभारलेले उद्योगामुळे तालुक्यात भरभराट झाली परिणामी

कोपरगाव : सहकार कृषी क्षेत्रात अग्रणी तालुका म्हणुन कोपरगावची राज्यात वेगळी ओळख आहे.सहकारातून उभारलेले उद्योगामुळे तालुक्यात भरभराट झाली परिणामी राज्याच्या राजकारणातही आजपर्यंत हा तालुका महत्त्वाचा गणला गेला. माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांचा शैक्षणिक आणि सहकारातील विचारांचा वारसा घेऊन मार्गक्रमण करणारे आशुतोष काळे यांना मागिलवेळी अल्पमताधिक्याने विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तिचे सोने करुन कोपरगाव तालुक्यात विकासकामांसाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारांना भावला आणि कोपरगावमधून विक्रमी मताधिक्याने आशुतोष काळेंचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे आता कोपरगावकरांना काळे मंत्री बनण्याचे वेध लागले असुन अजितदादांनी मोठी जबाबदारी देणार असल्याचा वादा केला होता. तालुक्यातील जनतेच्या भुवया त्याच दिवशी उंचावल्या होत्या.
उच्च शिक्षित शांत संयमी स्वभावाचा युवा चेहरा म्हणुन काळेंची ओळख निर्माण झाली असुन या निवडणूकीत ते मुळीच गाफील राहीले नाही.प्रकृती ठणठणीत नसतानाही माजी आमदार अशोकराव काळे दुःखाच्या प्रसंगी प्रत्येक कुटुंबाच्या भेटीला गेले.निवडणूक काळात प्रचारार्थ त्यांच्या प्रत्येक गावात दोनवेळा गाठीभेटी झाल्या. आशुतोष काळेंच्या मातोश्री पुष्पाताई आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ.चैताली काळे यांनीही महिलांशी वेळोवेळी हितगुज केले. प्रचारादरम्यान गावासाठी काय केले त्याचा लेखाजोखाच छापुन मतदारांच्या हातात दिला.आमदार काळे यांनी पाच वर्षात साध्या चहाच्या टपरीचे उद्घाटनचे निमंत्रणही आनंदाने स्विकारुन जातीने हजर राहीले.हा साधेपणा आणि विकासकामांची जोड समाजाला भावली आणि त्याचे परिवर्तन विधासभेच्या निकालात त्यांना 1,24,624 मताधिक्य देऊन तालुक्याने त्यांचा गौरव केला. कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न, प्रशासकीय भवने, बस स्थानक, दळणवळणाचे मार्ग, विशेषतः वाडी वस्तीवर जाणारे पाणंद शिवरस्ते त्यांच्या यशाचे गमक आहे.याशिवाय उत्तम प्रकारे साखर कारखाना चालवून एका उत्तम प्रशासकाची अनुभूतीही आलेली आहे. त्यामुळे तालुक्यात काळेंचे नेतृत्व विविध पक्षांच्या नेत्यांनादेखील मान्य झाल्यामुळे सर्वजण एका व्यासपीठावर आली. पारंपारिक विरोधकांनीही युतीधर्म पाळुन काळेंसाठी आपली यंत्रणा कामाला लावली.परिणामी काळेंचे मताधिक्य राज्यात चौथ्या स्थानावर तर पक्षात दुसर्या क्रमांकावर जाऊन पोहचले. विधानसभा प्रचारा दरम्यान कोपरगावला अजित पवारांनी ऐंशी हजार मताधिक्य दिल्यास काळेंवर मोठी जबाबदारी देणार असल्याचा शब्द दिला.त्या शब्दाचा टप्पा पार करुन काळेंना तालुक्याने सव्वा लाख मताधिक्य दिल्यामुळे आता तालुक्याला मंत्रीपदाची ओढ लागली आहे.त्यात अजित पवारही शब्दाचे पक्के असल्यामुळे शब्द पाळला जाईल या अपेक्षेने तालुक्यात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना फ्लेक्स बोर्डवर लालदिव्याची गाडी नामदार,मंत्री म्हणुन प्रकट केल्या तर त्यात गैर काय?’ आता दिलेला शब्द आणि तालुक्याच्या जनमताचा भावनांचा पक्षश्रेष्ठींकडून आदर व्हावा हीच सर्वसामान्य नागरीकांची अपेक्षा असल्यामुळे तालुक्यातील जनतेची नजर सध्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आणि त्या मंत्रिमंडळात काळेंचा समावेश असेलच ही भावना मनात ठेऊन सध्या तालुक्यात कुजबुज होताना दिसुन येत आहे.
COMMENTS