Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावचे डॉ. रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्रदान

कोपरगाव ः आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दिला जाणारा भारतीय वैद्यक क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार

शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75
समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)
केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कृत करण्याचा वर्ल्ड पार्लमेंटचा मानस

कोपरगाव ः आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दिला जाणारा भारतीय वैद्यक क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास म्हाळूजी आव्हाड यांना हरियाणा येथे नुकताच प्रदान करण्यात आला.  रोख पाच लाख रुपये, मानपत्र, शाल, कलश, श्री. धन्वंतरी मूर्ती, स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार दरवर्षी आयुर्वेद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्‍या भारतातील फक्त तीन आयुर्वेद डॉक्टर्स ला दिला जातो. धन्वंतरी जयंती व 8 व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार आयुर्वेद प्रचार प्रसार साठी भारत व भारताबाहेरील केलेल्या कार्याची दखल स्वरूप हा पुरस्कार दिला जातो.
यंदा हा भव्य सोहळा पंचकुला हरयाणा येथे धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावर्षी प्रथम क्रमांकाची पसंती कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली तर्फे आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेले डॉ. रामदास आव्हाड यांना मिळाली. त्यांच्याबरोबर डॉ. पांचाभाई दमानिया (गुजराथ) व डॉ. माधवन (त्रिवेंद्रम) यांचीही या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून निवड झाली. आयुर्वेद क्षेत्रातील भारत सरकार तर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. यापूर्वी ही गेल्या 35 वर्ष्यापासून कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणार्‍या डॉ. आव्हाड यांना 40 हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत, निस्वार्थ मनाने व प्रामाणिक पणे आयुर्वेद केल्याचे हे फळ असून ग्रामीण भागात राहणार्‍या माझेसारख्या सामान्य वैद्याचीही दखल घेतली जाणे हे भाग्याबरोबरच कौतुकास्पद ही असल्याचे डॉ. आव्हाड प्रतिक्रियेत म्हणाले. आजपर्यंत डॉ. आव्हाड श्रद्धेने, विश्‍वासाने व प्रामाणिकपणे करत असलेल्या आयुर्वेद रुग्णसेवेचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया हजारो हितचिंतकांनी स्वतःहून बोलून दाखवली. सर्व भारत भरातील उच्चपदस्थ व्यक्तीकडूनही अभिनंदन होत असल्याने या पुरस्काराचे महत्व अधिक वाटू लागल्याचे डॉ. आव्हाड यांनी म्हटले.

हा पुरस्कार आयुर्वेदावर विश्‍वास दाखवून स्वास्थ्यप्राप्त झालेल्या लाखो रुग्णांना, आयुर्वेदामुळे मिळालेल्या हजारो विद्यार्थी मित्रांना व आयुर्वेदाचा अभिमान बाळगणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाला हा पुरस्कार समर्पित करतो.
 डॉ. रामदास आव्हाड

COMMENTS