कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या अवैध धंद्यावर शहर पोलीस निरीक्षक रामराव यांनी आपला मोर्चा वळवला असून नुकतीच कोपरगाव

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या अवैध धंद्यावर शहर पोलीस निरीक्षक रामराव यांनी आपला मोर्चा वळवला असून नुकतीच कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मनाई वस्ती येथील गावठी दारू बनवणार्या हातभट्टीवर धाड टाकत दारूसाठी वापरात येणार्या कच्चा माल नष्ट केला. कोपरगाव शहर पोलिसांनी गावठी दारू हातभट्टीवर धाड टाकत 20 हजाराचे साहित्य नष्ट केले. त्यांच्या या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर परिसरात बुधवारी 24 मे रोजी सकाळी 6 वाजून 40 मिनिटांच्या वेळेस शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत मनाई वस्ती येथील रहिवाशी श्रावण भरत गायकवाड हा 25 वर्षीय युवक नारंदी नदीच्या काटवनात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा गावठी दारू तयार करण्याचे 20 हजार रुपये किमतीचे आंबट उग्र वास येणारे कच्चे रसायन बाळगून आढळला. त्याच्या ताब्यातील सदर कच्चे रसायन पोलीस पथकाने नष्ट केले असून पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्या फिर्यादीवरून दारूचे कच्चे साहित्य बाळगत असलेला पकडलेला श्रावण भरत गायकवाड या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 246/2023 महा प्रोटिशन ऍक्ट 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या नेतृत्वाखालील शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने केली आहे.
शहर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची आगामी काळात अवैध धंद्यावर करडी नजर राहणार असून असे गुन्हे करणार्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
भरत दाते. पोलीस उपनिरीक्षक शहर पोलिस.
COMMENTS