Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर खंडपीठ कृती समितीची गुरुवारी मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

कोल्हापूर / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापने संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी ग

शेडगेवाडी-मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरु; शिराळा तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यास यश
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी
मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी

कोल्हापूर / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापने संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता खंडपीठ कृती समितीच्या शिष्ट मंडळाला भेटीसाठी वेळ दिली आहे. ही भेट यापूर्वी बुधवारी निश्‍चित झाली होती. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आल्याचे पत्र मुख्य न्यायमूर्ती यांच्या कार्यालयातून प्राप्त झाले आहे. कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरिष खडके यांनी ही माहिती दिली.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचला मुख्य न्यायमूर्ती यांच्या कक्षात बैठक होणार आहे. कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या अनुषंगाने चार दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले होते. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर खंडपीठासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांच्याशी चर्चा करावी, अशी ठाकरे यांना विनंती करण्यात आली होती.
दरम्यान, कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक गुरुवारी सायंकाळी कुलाबा येथील महिला विकास महामंडळाच्या सभागृहात बोलाविली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने होत असलेल्या बैठकीस लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे, असे अध्यक्ष खडके, चिटणीस अ‍ॅड. विजय ताटे-देशमुख यांनी सांगितले.
खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. खडके, ताटे-देशमुख यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री पाटील यांची रविवारी सकाळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्य न्यायमूर्ती यांच्या भेटीत होणार्‍या चर्चेची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात येईल. त्यानंतर खंडपीठाबाबत निर्णायक भूमिका घेण्यात येईल, असेही अ‍ॅड. खडके यांनी सांगितले.

COMMENTS