सांगलीच्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीच्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला

सांगली : सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींनी चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्ष

सह्याद्री खरेदी-विक्री संघ खत कारखाना उभारणार : सत्यजित देशमुख
हदगाव वनपरिक्षेत्रातील वन जमिनीवरील काही अतिक्रमण  हटविले !
क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने पती-पत्नी जागीच ठार | LOK News 24

सांगली : सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींनी चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केलं आहे. गेडाम या पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असता हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडण्याचा प्रयत्न केला. उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर गलिच्छ भाषेचा वापर केला. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. यानंतर झालेल्या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे. त्यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला.

COMMENTS