शिडी/प्रतिनिधी ः मकरसंक्रांतीनिमित्त शिर्डीत पतंग उडवण्याची स्पर्धेत आनंद घेताना तरुण व लहान मुले दंग होऊन मनसोक्त आनंद घेताना दिसून आले. अनेकांन
शिडी/प्रतिनिधी ः मकरसंक्रांतीनिमित्त शिर्डीत पतंग उडवण्याची स्पर्धेत आनंद घेताना तरुण व लहान मुले दंग होऊन मनसोक्त आनंद घेताना दिसून आले. अनेकांनी आपल्या घरावर इमारतींवर स्पीकर लावून सामूहिक पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतला. संस्थांनचे माजी विश्वस्त सचिन तांबे व मित्रमंडळी साईबाबा मंदिराच्या जवळून आकाशात साईंचा जयजयकार करत पतंग उडवण्याचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परंपरा राखत आपला छंद जोपासला.
सध्या मकर संक्रांतीनिमित्त आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंगच उंच उंच पक्षांप्रमाणे तरंगताना व एकमेकाचा पतंग काटाकाटी करण्याचा एक वेगळाच आनंद सर्वजण सध्या अनुभवत आहेत. एकूणच कोरोणानंतर मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची धूम सर्वत्र दिसून आली. अनेक छोट्या मोठ्या दुकानात वेगवेगळ्या आकाराचे रंगीत पतंग विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तसेच असरी, दोरा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे दिसून आले. नायलॉन मांजा विक्रीला बंदी असल्यामुळे अनेक जण पतंग उडवण्यासाठी साधा दोरा वापरत होते. पतंग काटल्यानंतर तो हळूहळू जमिनीवर येतो. इमारतींना अडकतो, हा पतंग पकडण्यासाठी लहान मुले मोठी धडपड करताना रविवार सुट्टीनिमित्त साई भक्तांची मोठी गर्दी केली होती. साई भक्तही हा पतंगाचा खेळ मोठ्या आनंदाने पाहताना दिसत होते.
COMMENTS