बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथील माजी ग्रा. सदस्य बापुसाहेब महादेव पवार आणि संदीप महादेव पवार यांच्या मातोश्री. कै. ग
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथील माजी ग्रा. सदस्य बापुसाहेब महादेव पवार आणि संदीप महादेव पवार यांच्या मातोश्री. कै. गवळणबाई महादेव पवार यांच्या प्रथम पुणयस्मरण निमित्त ह.भ.प गुरुवर्य महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली ह. भ. प परमेश्र्वर महाराज वरकड यांची किर्तन सेवा संपन्न झाली.अक्काने गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेचे किर्तन एकूण दादांचं दर्शन घेउन घरी गेल्यावर देह सोडला होता.असे मरण यायला सुद्धा भाग्य लागतं. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणुन भगवंतच वेड लावून घ्यावं लागतं. ज्याला प्रपंच करायचा आहे त्याच्याकडे वित्त असायला पाहिजे असं महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला.
ऐसे का हो न करा काही । पुढे नाही नास ज्या
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ श्रुतीचे का नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥
तुका म्हणे पुढे काही । वाट नाही यावरी ॥
तुकाराम महाराज म्हणतात अहो लोकहो तुम्ही असे का नाही करत, म्हणजे ज्या गोष्टींचा पुढे जाऊन नास होणार नाही अशी गोष्ट तुम्ही का साध्य करून घेत नाहीत, अशा गोष्टींचा तुम्ही ध्यास का घेत नाहीत. ते म्हणतात विश्वंभराला शरण जाणे येथे हाच एकमेव मार्ग असून सर्व भूतमात्रांना वंदन करणे, त्यांचा मान राखणे हेच नारायणाला शरण जाण्यासारखे आहे. कारण वेद, श्रुतीच्या नुसत्या पारायणांनी काही साध्य होणार नाही, त्याचे जे सार आहे ते तुम्ही का लक्षात घेत नाही…
तुकोबाराय शेवटी म्हणतात अशा ह्या नाशिवंत भूतलावर सर्वभावे श्री हरीला शरण जाणे, त्याच्यावर विसंबून त्यावर आपला पूर्ण भार टाकणे हेच खरे उद्धाराचे मार्ग आहेत आणि याखेरीज येथे अन्य कोणताही मार्ग नाही. अस जीवन जगा की आपले जिवन अमूल्य कीर्ती रुपी शिल्लक राहिले पाहिजे. तुम्ही आम्ही करतो ते कर्म वेगळं शास्त्र आणि संत जे कर्म सांगतात ते कर्म वेगळे आहे. 100 वर्षांच्या आयुष्यत चार टप्पे आहेत. या चार टप्प्यामध्ये कसे जिवन जगायचं हे संतांनी आणि शास्त्राने सांगीतले आहे. विद्याग्रहण कसे करायचे हे पाहिल्या टप्प्यात सांगीतले आहे. शास्त्र सांगते अहो रात्र प्रयत्न केल्यावर 1 ते 25 या वयामध्ये विद्या ग्रहण करायचं वय असते. दुसर्या टप्प्यामध्ये 25 धन कमवायचा महाराजांनी सांगीतले तसेच तिसर्या टप्प्यामध्ये पुण्य कमवा तर सुखी राहाल असं शास्त्राने सांगीतले आहे. या सृष्टीचा नियम आहे जन्म आला आहे तर त्याला मृत्यू ला जावेच लागते. जन्म मृत्यू अटळ आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यु आहे. त्याच कर्म अटळ आहे. आपण असे जिवन जगा की आपण मृत्यु पावलो तर प्रत्येकाने रडले पाहिजे. असे जीवन जगा की आपण गेल्या नंतर लोकांनी आपल्याला कीर्ती रुपी लक्ष्यात ठेवले पाहिजे. जन्म मृत्यू या ला किंमत नाही महत्त्व नाही तो या मधील आयुष्य कसा जगला याला महत्त्व आहे. यावेळी महाराष्ट्र ज्यांना मृदुंग महामेरू म्हणुन ओळखतो असे राम महाराज काजळे भाऊ, गायनसम्राट गोरख महाराज वायभट, अनिल महाराज काजळे, अमोल महाराज पवार चाकरवाडीकर, रोडे महाराज, सुधाकर महाराज, शेळके महाराज, अनिकेत महाराज , नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि महाराज मंडळी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS