बीड । प्रतिनिधीविसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 28 व्या वर्षातील सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, माघ शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीक्षेत

बीड । प्रतिनिधी
विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 28 व्या वर्षातील सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, माघ शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी, ता. जि. बीड येथे ह.भ.प. रामायणाचार्य गोविंद महाराज नाईकवाडे (खेर्डा) यांचे भव्य कीर्तन रविवार, दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे गुरुवर्य शांतीब्रह्म ह.भ.प. नवनाथ महाराज यांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर समस्त गावकरी मंडळी, मन्यारवाडी (ता. जि. बीड) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाबांचा पालखी सोहळा सकाळी 8 वाजता सुरू होईल. तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणा सकाळी 9 ते 10 या वेळेत भाविकांसाठी खुली राहणार आहे.

COMMENTS