Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव

संगमनेर प्रतिनिधीः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वेल्हाळे परिसरातील हरीबाबा दे

SANGAMNER : मेडीकव्हर हॉस्पिटल्स सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर l Lok News24
अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची अनागोंदी थांबावी
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर

संगमनेर प्रतिनिधीः काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वेल्हाळे परिसरातील हरीबाबा देवस्थान येथे 31 जानेवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 या काळात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तानाजी शिरतार यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तानाजी शिरतार म्हणाले की, आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी जंगी कुस्त्यांचे आयोजन होत असून यावर्षी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सायं. 7 ते 9 वा. ह.भ.प आरतीताई दिघे यांचे किर्तन होणार असून दिनांक 01 फेब्रवारी 2023 रोजी भागवताचार्य ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील, दिनांक 02 फेबु्रवारी 2023 रोजी ह.भ.प विशाल महाराज खोले, दिनांक 03 फेबु्रवारी 2023 रोजी ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, दिनांक 04 फेब्रुवारी 2023 रोजी ह.भ.प अनिल महाराज तुपे, दिनांक 05 फेबु्रवारी  2023 रोजी ह.भ.प सागर महाराज बोराटे , दिनांक 06 फेब्रुवारी 2023 ह.भ.प महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे हरिकिर्तन होणार आहे. मंगळवार 7 फेब्रवारी 2023 रोजी स.10 वा.समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तानाजी शिरतार, हरिबाबा तरुण मित्र मंडळ यांनी केले आहे.

चौकट——
संगमनेरमध्ये रविवारी शिंदेशाही बाणा कार्यक्रम – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेशाही बाणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग सांभाळताना बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय तर कृषी विभागात एक लाख शेततळ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे .याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करताना राज्यात काँग्रेसला पुन्हा भरारी दिली आहे.

COMMENTS