Homeमहाराष्ट्रबीड

वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडवणी । प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

करुणा धनंजय मुंडे यांनी केली नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा
पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरेयांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
केज येथील जीवन शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

वडवणी । प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम शनिवार, दि. 03 जानेवारी 2026 व रविवार, दि. 04 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहेत.
शनिवार दि. 03 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 ते 6:00 या वेळेत हरिपाठ होईल. त्यानंतर सायंकाळी 8:30 ते 10:30 या वेळेत श्री. ह.भ.प. महादेव महाराज जाधव यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, रात्री 11 ते 1 या वेळेत हरीजागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. 04 जानेवारी रोजी पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा आरती, सकाळी 9 ते 10 अभिषेक व पूजा होईल. त्यानंतर सकाळी 11 ते 1 या वेळेत श्री. ह.भ.प. योगेश महाराज काननावकर यांचे पुण्यतिथीनिमित्त हरीकीर्तन होणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS