Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतातून ट्रॅक्टर नेण्यास विरोध करणार्‍याचा खून

म्हसवड / वार्ताहर : गोंदवले बु। (ता. माण), गावचे हद्दीत मळवी नावचे शिवारात अनिल रघुनाथ कदम, (वय 55 वर्षे )यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना आपल्या शेता

जात पडताळणी समितीची आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहिम
काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान
शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती : ना. जयंत पाटील

म्हसवड / वार्ताहर : गोंदवले बु। (ता. माण), गावचे हद्दीत मळवी नावचे शिवारात अनिल रघुनाथ कदम, (वय 55 वर्षे )यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना आपल्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध म्हणून चिडून दत्तात्रय अरुण यादव यांनी अनिल कदम यांचा खून केला असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गोंदवले बु। (ता. माण), गावचे हद्दीत मळवी नावचे शिवारातील तक्रारदार (शिवराज अनिल कदम, वय 26 वर्ष, रा. वरचामळा गणपती मंदिराजवळ गोंदवले बुद्रुक) यांच्या शेतात तक्रारदारांचे वडील अनिल रघुनाथ कदम (वय 55) यांनी दत्तात्रय अरुण यादव यांना तू आमचे शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही असे म्हणालेच्या कारणावरून दत्तात्रय अरुण यादव यांनी अनिल कदम यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची मुले जयंत दत्तात्रय यादव, हर्षद दत्तात्रय यादव यांनी अनिल कदम यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी शिवराज कदम व घटनास्थळी असलेल्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून हर्षद यादव व जयंत यादव यांनी शिवराज कदम यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात केली. घटनेचे गांर्भिय जाणून उपविभागीय पोलीस अधिकारी अश्‍विनी शेंडगे यांनी घटनास्थळास भेट दिली. घटनेचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.

COMMENTS