Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

केज प्रतिनिधी - लग्नाची मागणी घातली परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने पालकांनी लग्नाला नकार दिला. यामुळे तरुणाने सदरील मुलीचे अपहरण केले असून या घटन

एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या 37 खेळाडूंची निवड
प्लॅस्टिक कॅरीबॅगवर कडक बंदी आणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
अकरावी प्रवेशासाठी हवे नामांकित कॉलेज : विद्यार्थ्यांचा अट्टहास

केज प्रतिनिधी – लग्नाची मागणी घातली परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने पालकांनी लग्नाला नकार दिला. यामुळे तरुणाने सदरील मुलीचे अपहरण केले असून या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित तरुणा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील उमेश आश्रुबा केदार याने एका मुलीच्या कुटुंबाकडे लग्नाची मागणी घातली होती. परंतु सदरील मुलीचे वय 15 वर्ष असल्याने वडिलांनी लग्नाला नकार दिला. तेंव्हा पासून उमेश हा नेहमीच मुलीची छेड काढून त्रास देत होता तर पळवून नेण्याची धमकी देत होता. शनिवारी ( दि. 29 ) घरी कोणी नसल्याने तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले. सायंकाळी आई-वडील शेतातून घरी आले असता मुलगी घरी दिसून आली नाही. इतरत्र खुप शोध घेतला परंतु कुठेही नसल्याने शेवटी उमेशच्या घरी चौकशी केली असता तोही गायब असल्याचे कळले. यावरून त्यानेच मुलीला फुस लावून पळवून नेले म्हणून मुलीच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून उमेश आश्रुबा केदार याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास केज पोलीस करत आहेत. परंतु या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

COMMENTS