Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा

8 महिन्याच्या मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी आई वडिलांच्या स्वाधीन केले

नागपूर प्रतिनिधी - लहान मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र यातील तीन आरोपी फरार झाले असू

वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार
अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात
विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक

नागपूर प्रतिनिधी – लहान मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र यातील तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अगदी काही तासात  अपहरण  केलेल्या 8 महिन्याच्या मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी आई वडिलांच्या स्वाधीन केले. नागपूरच्या कळमना परिसरात गुरूवारी दुपारच्या वेळी घरासमोरच राहणाऱ्या एका व्यक्तीने आठ महिन्याच्या बाळाला घेऊन फरार झाला. आई- वडिलांनी रात्रीपर्यंत शोधाशोध केली. मात्र मिळून न आल्याने रात्री दहा वाजता पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपले चक्र फिरवले आणि तीन पोलीस स्टेशनचा स्टाफ या कामात लावला. अगदी काही तासात पोलिसांनी या अपहरणकर्त्याचा शोध घेतला.

COMMENTS