Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपहरण झालेल्या चिमुकल्याची पोलिसांकडून सुटका

संगमनेर ः अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने 11 महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटक

नगर जिल्ह्यात देशाला हादरून टाकणारा भ्रष्टाचार
जिल्हास्तरीय तलवार बाजी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय
आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी ः माजी खा. तनपुरे

संगमनेर ः अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने 11 महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले.
अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या 11 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन यासंदर्भात पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना माहिती दिली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक पोलीस पथकाच्या मदतीने दोन पथके तयार करून संशयित आरोपीच्या मागावर पाठविण्यात आले. रेल्वे पोलिसांसोबत स्थानिक पोलिसांनी समांतर तपास करत गुंजाळवाडी शिवारात नवनाथ विष्णू धोत्रे यांच्या राहत्या घरातून या चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच नवनाथ धोत्रे याला पुढील कारवाईसाठी पोलिसांनी नगरला नेले आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद मोरे, राजु झोले, अशोक पारधी, पोलीस नाईक पांडुरंग पटेकर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कुर्‍हे, शितल बहिरट व अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. लोणकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. आर. गौळी, पोलीस कॉन्स्टेबल पी. बी. गडाख, पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, अविनाश खरपास, आसाराम येवले, किरण तोरमल, मंगल आहेर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता समिदर यांनी केली आहे.

COMMENTS