लोणी : केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या धोरणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
लोणी : केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या धोरणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाला विशेष प्राधान्य दिले आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा ग्रामीण खेळाडूंनी लाभ घेत खेळातून उत्तम करिअर करावे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय” म्हणून तिस-यांदा गौरविलेले एकमेव महाविद्यालय असलेल्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये नुकत्याच अॅथलॅटिक्स अस्मिता लिग-२०२५ स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुस्मिता विखे पाटील बोलत होत्या.
अहिल्यानगर जिल्हा असोसिएशन व प्रवरा स्पोर्टस अॅकॅडमी आणि महिला गृहविज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर १४ व १६ वयोगटातील अॅथेलेटिक्स अस्मिता लिगचे आयोजन फक्त मुलींसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता संपूर्ण जिल्ह्यामधून ५७८ विद्यार्थीनीं स्पर्धक सहभागी झाल्या होत्या, ही आपणां सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. १४ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थीनींमधील अॅथेलेटिक्स खेळामधील टॅलेंट ओळखून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वतीने स्पोर्टस टॅलेंट सर्च योजना राबविण्यात येते. या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार व्हावा याकरिता केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाने भारत देशामधून अहिल्यानगर जिल्ह्याची निवड केलेली आहे. या अस्मिता लिगचा प्रमूख उद्देश म्हणजे १४ व १६ वर्षे वयोगटातील मुलींमधील स्पोर्टस मधील सुप्त गुण ओळखून, अशा विद्यार्थीनीना याव्दारे मार्फत पुढील क्रीडा प्रशिक्षण, आहार, रहाण्याची सुविधा, भोजन, उच्च शिक्षणाचा खर्च ही केला जाणार आहे. सदर स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांकांच्या खेळाडूंना भारतीय क्रिडा प्राधिकरण यांच्याकडून मेडल्स आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमीच ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन दिले असून, संस्थेच्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा म्हणून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नुकतीच प्रवरा स्पोर्टस अॅकॅडमीची स्थापना केली असून, यामध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, अॅथलॅटिक्स व तायकोंदो या खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे, या संधीचाही परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. राम पवार यांनी केले आहे
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदिप दिघे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनिल जाधव, राजेंद्र कोतकर, दिनेश भालेराव, सचिव, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.ए. पवार, गृहविज्ञान विभागाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, संस्थेचे क्रिडा संचालक डॉ. उत्तम अनाप यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS