जामखेड ः खर्डा येथे आरोग्य केंद्राची कोट्यावधी रुपयांची मोठी इमारत बांधली असून त्यात खर्डा ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र सद

जामखेड ः खर्डा येथे आरोग्य केंद्राची कोट्यावधी रुपयांची मोठी इमारत बांधली असून त्यात खर्डा ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र सदर रूग्णालयात कोणत्याही आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. या केंद्राला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. कोणत्याही शारीरिक तपासणीसाठी या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नाही. सर्दी, ताप, खोकला या औषधावरच रुग्णांना समाधान मानावे लागत आहे. रुग्णांना शस्त्रक्रिया मोठमोठ्या तपासण्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, नेत्ररोग तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया व इतर गंभीर आजारावर कोणत्याही स्वरूपाचा उपचार व यंत्रणा या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली देखणी इमारत उपचार सुविधाअभावी असून खोळंबा नसून अडचण ठरत आहे. नागरिकांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. या गंभीर बाबीकडे आमदार द्वियीचे दूर्लक्ष होतांना दिसत आहे. आरोग्याच्या बाबतीत स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकारी व आमदारांबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खर्डा हे मोठे गाव आहे. मलाही वाटते इथे गरोदर महिलांची प्रसूती सुविधा सुरू व्हावी परंतु तांत्रिक अडचणी येतात, इथे रक्त लघवी तपासणी मशीन शासनाने उपलब्ध करून द्यावी, महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिला जास्त असल्यावर केले जाते. त्यामुळे पेशंट जामखेडला पाठवावे लागते. सध्या इथे मी एकटीच असते. आरोग्य अधिकारी जागा कायमस्वरुपी भरली तर फरक पडेल. वयोवृध्द दाखले, शवविच्छेदन इत्यादी बाबी वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी करून निर्णय घेण्यात यावा.
डॉ. प्रियंका मेंगडे, वैद्यकीय अधिकारी, खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र
COMMENTS