देशातील सर्वात प्रथम उभारले गेलेल्या खरगपूर आयायटी ही शासकीय उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील एक अग्रणी संस्था म्हणून
देशातील सर्वात प्रथम उभारले गेलेल्या खरगपूर आयायटी ही शासकीय उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील एक अग्रणी संस्था म्हणून परिचित आहे. या संस्थेचा लौकिक असा की, येथील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये असतानाच लठ्ठ पगाराचे जाॅब त्यांच्या खिशात असतात. विज्ञानाचा पुढचा टप्पा असतो तंत्रज्ञान. तंत्रज्ञान हे क्षेत्र असे असते की, त्याच्या आधारावरच जगाचा आर्थिक विकास होतो. औद्योगिक क्षेत्राचा विकास या संस्थांवरच अवलंबून असतो, इतके महत्त्व या संस्थांना असते. त्यामुळे, आयआयटीत शिकायला मिळणं हे विद्यार्थ्यांचे एक स्वप्न असतं. अशी ही महत्वपूर्ण संस्था आज जागतिक पातळीवर बदनामी होण्याइतपत वादग्रस्ततेला सामोरी जात आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रमाण संस्था असणारी खरगपूर आयआयटी सध्या अवैज्ञानिक आणि खोटा इतिहासाच्या प्रकरणात बदनाम होत आहे. त्याचे झालं असं की, भारतातील ब्राह्मण समुदाय हा आर्य म्हणून भारतावर आक्रमण करणारा घटक असल्याचा इतिहास दस्तुरखुद्द टिळकांनी देखील मांडला आहे. आर्यांनी खैबर खिंडीतून भारतावर आक्रमण केल्याचा इतिहास हा मान्यताप्राप्त इतिहास म्हणून स्थिरावला आहे. मात्र, या इतिहासालाच खोटा ठरवण्याचा अट्टाहास करित कोणत्याही संशोधनाशिवाय आर्य याच देशाचे असल्याचं खरगपूर आयआयटीने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडर मध्ये दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबल नसून पुराण कथातील अनेक भाकडकथांचे संदर्भ देखील या कॅलेंडर मध्ये छापण्यात आले आहेत. आयआयटी च्या विद्यमान व्यवस्थापनाने छापलेले हे कॅलेंडर खरगपूर आयआयटी च्या आजी-माजी विद्यार्थी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या टीकेचा विषय झाला आहे. विरेंद्र कुमार तिवारी, अनिल सहस्त्रबुद्धे आणि केंद्रीय मंत्रालयातील संजीव संन्याल यांनी हा सारा खटाटोप केला आहे. याच कॅलेंडर मध्ये विष्णूपुराण आणि अनेक पुराणातील प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. या कॅलेंडर च्या समर्थनार्थ व्यवस्थापन म्हणते की, आर्यांच्या विषयी खोटा इतिहास सांगण्यात येतो की, ते खैबर खिंडीतून आले. हा खोटा इतिहास खोडून काढणे हाच या कॅलेंडर चा उद्देश असल्याचे ते सांगतात. भारतातील सर्वच इतिहास संशोधकांनी सिध्द केलेला इतिहास खोटा असल्याचे सांगण्याचे अविवेकी धाडस या देशात फक्त ब्राह्मणी संस्कृती जोपासणाऱ्या आरएसएस कडूनच केले जाऊ शकते. कारण विद्वत्ता, विवेक, संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन या कशाशीही आरएसएस ला घेणेदेणे नाही. त्यांना या देशातील ब्राह्मणेतर समाजावर जुलमी सत्ता लादण्याची नशा तेवढी चढली आहे. या कॅलेंडर वर आक्षेप घेणारे देखील एका अर्थाने ब्राह्मणी संस्कृतीचे रक्षकच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. कारण या कॅलेंडर मधून आयआयटी खरगपूर व्यवस्थापन हिंदूत्ववादी विचारसरणी लादत असल्याचा आरोप ज्या विद्वानांनी केला आहे, त्यांना देखील आमचा आक्षेप आहे. संघाची प्यादी असणारे व्यवस्थापन हे ब्राह्मणी विचारसरणी लादत असताना व्यवस्थापन विरोधात असणाऱ्यांनी या ब्राह्मणीवादाला कोट न करता त्याला हिंदूत्ववादी म्हणून बदनाम केले जात आहे. ब्राह्मणी संस्कृती लादण्यासाठी संघ हिंदू समाजाचा आधार घेतो. अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मणी शक्तींचा स्वतः ला बहुसंख्य भासवण्याचा हा डाव आम्ही याच सदरात यापूर्वी लिहीलेल्या एका लेखात उघड केला होता. गुणवत्ता-गुणवत्ता म्हणून ओरडणारी संघ संस्कृती खऱ्या अर्थाने गुणवत्तेची शत्रु आहे. परंतु, कोणत्याही सत्तेशिवाय संघ परिवारावर केलेला आरोप त्यांना झोंबत नाही. सत्तेत आल्यावर षडयंत्र करणारी ही संस्कृती सत्ता नसताना अतिशय भित्री आणि मिंधे पध्दतीने राहते. मात्र, सत्ता आली की, सर्वत्र षडयंत्र करण्याच्या बाबीला ते कृतीत आणतात. सत्यमेव जयते या ब्रीदवर ब्राह्मणी संस्कृतीचा विश्वास नसल्याचे जे वेळोवेळी सिध्द होते; याही प्रकरणात तेच होताना दिसत आहे! या प्रकरणात आम्हाला एवढंच सुचवायचं की, विरोध करणाऱ्यांनी आयआयटी व्यवस्थापनाचे हे षडयंत्र ब्राह्मणी षडयंत्र आहे, असा जाहीर आरोप केला तरच ते वास्तव ठरेल!
COMMENTS