Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खैरी निमगावचा पाणीपुरवठा खंडीत

वीज बिल थकल्यामुळे कारवाई

निमगावखैरी/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव ग्रामपंचायतीचे विज बिल थकल्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरला वाचवण्यात अपयश
बाळच्या जीवाला नगर व पारनेरला धोका…नाशिकला ठेवा ; वकिलाने केली न्यायालयाकडे मागणी, निर्णयाची प्रतीक्षा
साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा

निमगावखैरी/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव ग्रामपंचायतीचे विज बिल थकल्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून खैरी निमगांवकरांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
खैरी निमगांव ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे तिन कनेक्शन असल्याने विज बिलाचा आकडा मोठा झाला आहे. विजेअभावी संपूर्ण गावाला पिण्याचे पाणी पुरवणारे खोकड विहीर तलावातील पिण्याच्या पाण्यापासून गावाला वंचित राहावे लागत आहे. सध्या गहू कांदे काढणीला आले असुन नागरिकांना शेतीच्या कामाऐवजी आता त्यांना पाण्यासाठी दिवसभर घरीच राहावे लागत आहे. ग्रामपंचायतीने विज बिल न भरल्याने पुरवठा खंडीत केला आहे. एकतर पाणी कमी पडले असताना विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी पुरवठा करता येत नाही. विद्युत पुरवठा नसल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पशुधनालाही पाणी मिळत नाही. गावात दुधधंदा मोठ्या प्रमाणात असल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात त्वरीत दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे. ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने पाण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल हे अद्यापतरी निश्‍चीत सांगता येणार नाही. परंतु नागरीकांच्या भावनांची कदर करत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

COMMENTS