Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधा

मेडिकव्हर रुग्णालय उडवण्याची धमकी
ईशान संदीप कोयटेला अभिनयाचे प्रथम पारितोषिक
भागचंद ठोळे विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतलेली देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांची वैयक्तिक पत्रे परत करावीत, अशी मागणी पंतप्रधान संग्रहालयाने केली आहे. यासंदर्भात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे.
देशात 2008 मध्ये काँग्रेस नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान संग्रहालयात असणारी पंडित नेहरु यांची पत्रे मागवली होती. पंडित नेहरूंची ही वैयक्तिक पत्रे ऐतिहासिक मानली जातात. यापूर्वी ही पत्रे जवाहरलाल नेहरू मेमोरिअलकडे होती. 1971 मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला देण्यात आली होती. आता हे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. पंडित नेहरू यांनी अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजय लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद वल्लभ पंत इत्यादी महान व्यक्तींमधील संभाषणांवर आधारित ही पत्रे आहेत. पंतप्रधान संग्रहालयाचे सदस्य रिझवान कादरी यांनी 10 डिसेंबर रोजी राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्रात कादरी यांनी राहुल गांधींना सोनिया गांधींना दिलेली पत्रे, फोटो कॉपी आणि डिजिटल कॉपी परत करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी संग्रहालयाने सप्टेंबरमध्ये सोनिया गांधी यांना पत्रही लिहिले होते. यासंदर्भात रिजवान कादरी यांनी सांगितले की, सप्टेंबर 2024 मध्ये मी सोनिया गांधींना पत्र लिहून विनंती केली की, 2008 मध्ये नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररीमधून घेतलेली पत्रे संस्थेकडे परत करावीत. संबंधित पत्रे ही आम्हाला पाहण्याची परवानगी दिली जावी. तसेच ती स्कॅन करुन एक प्रत आम्हाला उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आम्ही त्यांचा अभ्यास करू शकू, अशी विनंती मी विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना पत्राव्दारे केल्याचे कादरी यांनी सांगितले.

COMMENTS