केतकी चितळेला पोलिसांनी केली अटक ; कार्यकर्त्यांनी फेकली शाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केतकी चितळेला पोलिसांनी केली अटक ; कार्यकर्त्यांनी फेकली शाई

शरद पवारांविरोधात केले होती आक्षेपार्ह पोस्ट भोवली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी अटक केली आहे.

एफआरपीची रक्कम मिळणार आता दोन टप्प्यात
जातीनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेऊ : पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन
ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसरीकडे निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवरून पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. अॅड. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली फेसबुक पोस्ट केतकीने शेअर केली आहे.

यात म्हटले आहे की,

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंकडून टीका-टिपण्णी केली होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी केलेल्या तक्रारीवरून केतकी विरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीने ही पोस्ट करून दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात केली आहे.

COMMENTS