Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केळगाव – बेळगाव बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस ; गावकर्‍यांचा वाढता पाठींबा

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील केळगाव - बेलगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचीत महिला सरपंच सौ. प्रणिता खंडेराव चौरे सह ग्रामस्थ ग्रांम पंचायत

आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त
शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता
गुन्हेगाराकडे सापडले ४ पिस्तुल, ३४ जिवंत काडतुसे,८ लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील केळगाव – बेलगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचीत महिला सरपंच सौ. प्रणिता खंडेराव चौरे सह ग्रामस्थ ग्रांम पंचायत येथे विविध न्यायीक मागण्या घेऊन उपोषणास बसले असता पंचक्रोशीतील नागरीकांचा आज दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात उपोषणास पाठिंबा मिळत आहे. सदरील उपोषणामध्ये केळगाव – बेलगाव ग्रुप -ग्रांमपंचायतीची बदनामी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी यासह आदिमागण्या घेऊन गावच्या बदनामी करणार्‍यांच्या विरोधात उपोषण अंदोलनाच्या माध्यमातून प्रणिता खंडेराव चौरे यांच्यासह ग्रामस्थ लढत आहेत. या त्यांच्या गावाच्या हितासाठी , विकासाठी असनार्‍या लढ्याकडे प्रशासन लक्ष देईल का ? केळगाव – बेलगावची होत असलेली बदनामी थांबेल का ? गावचा विकास होईल का ? आदि प्रश्न पंचक्रोशीतील नागरीकांना पडले आहेत.

COMMENTS