अहिल्यानगर : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये सर्वच वर्गवारीच्या ग्राहकांना अखंडित, शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणच्या अ

अहिल्यानगर : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये सर्वच वर्गवारीच्या ग्राहकांना अखंडित, शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्पर राहून ग्राहक समाधानासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे, तसेच या वर्षामध्ये ठरविलेली सेवा व योजनांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या कार्यात सतर्क व तत्पर राहण्याचे आवाहन महावितरणचे संचालक (संचलन व मानव संसाधन) अरविंद भादीकर यांनी केले.
सोमवारी महावितरणच्या सभागृहात नाशिक, अहिल्यानगर व मालेगाव मंडळातील सर्व कार्यकारी अभियत्यांची व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, जगदीश इंगळे व रमेश पवार उपस्थित होते. पुढे बोलताना अरविंद भादीकर म्हणाले की, प्रत्येक विभागामध्ये जास्त वीज गळती असलेल्या वाहिन्या यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरील वीजचोरी आणि तांत्रिक गळती कमी करण्यासाठी जोरकस सामूहिक प्रयत्न करावेत. यावर्षामध्ये सर्वच बाबतीत ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचाराने प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले. ग्राहक हे महावितरणसाठी महत्वाचे असून त्यांना सर्वच सेवा आणि सुविधा गतीने देण्याबरोबरच अखंडित वीज पुरवठा आणि तात्काळ वीज जोडणी यावर भर देण्याचे त्यांनी निर्देश दिले. ग्राहकसेवा आणि विविध योजनांची अंमलबजावणी यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सुतोवाच त्यांनी या बैठकीत केले. मार्चच नव्हे तर दरमहा सर्वानी वीजदेयकाची शून्य थकबाकी मोहीम परिमंडळात राबविण्याचे आवाहन संचालक अरविंद भादीकर यांनी केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री सौरघर मोफत वीज योजना, सौर ग्राम योजना, मागेल त्याला सौर पंप, अभय योजना यासह सर्व योजनांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. बैठकीमध्ये उपस्थित सर्व कार्यकारी अभियंते यांनी आगामी आर्थिक वर्षाची उद्दीष्टे, मागील वर्षी केलेले साध्य व उपाययोजना यासंदर्भात विविध विषयांचे व योजनांचे सादरीकरण संगणकीय माध्यमातून केले. बैठकीला नाशिक, मालेगाव व अहिल्यानगर मंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS