Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात केडगाव पोस्ट ऑफिस अव्वल

अल्पबचत योजनेचे सर्वाधिक खाते उघडण्याचा विक्रम

अहमदनगर ः अहमदनगर डाक विभागामध्ये एप्रिल 23 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणार्‍या  कर्मचार्‍याचा विश

मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान 
बौद्ध संस्कार संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
शेवगाव दगडफेक प्रकरणी 60 जण ताब्यात

अहमदनगर ः अहमदनगर डाक विभागामध्ये एप्रिल 23 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणार्‍या  कर्मचार्‍याचा विशेष कौतुक सोहळा प्रधान डाकघरातील पासपोर्ट हॉल येथे श्रीमती सिमरन कौर डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन पुणे यांच्या शुभहस्ते तर बी नंदा प्रवर अधीक्षक डाकघर अहमदनगर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. डाक विभागाच्या विविध  योजनेत उल्लेखनीय काम करणार्‍या पश्‍चिम व उत्तर  उपविभागातील  पन्नास पेक्षा अधिक कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना सिमरन कौर यांनी पुरस्कार प्राप्त कर्मचारी यांचे विशेष कौतुक करत, या आर्थिक वर्षात याही पेक्षा अधिक जोमाने काम करावे,डाक विभागाच्या योजना जनसामान्यांनापर्यत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व ग्रामीण भागात कार्यरत असणारे ग्रामीण डाकसेवकांचे मोलाचे योगदान असून,डाक विभागाच्या विविध योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात, त्याच्याच माध्यमातून अल्पबचतीच्या विविध योजनेची नवीन खाते उघडण्याच्या मोहीमेत मोठे काम होत आहे. उपविभागीय कौतुक सोहळ्यात  आपण विभागीय कर्मचारी यांचे सह ग्रामीण डाक सेवकांना आपण सन्मानित करत आहोत ही मोठी गौरवशाली  बाब असून, आगामी कालखंडात गौरवित कर्मचार्‍यांसह, सर्व कर्मचारी यांनी आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीत विभागाच्या विविध योजनेचा प्रचार प्रसार करून अधिकाधिक ग्राहक जोडावेत, ग्रामीण डाक सेवकांने आपण कार्यरत असणार्‍या ठिकाणी प्रत्येक घरात आपल्या योजनेचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असावे.आपल्या या सकारात्मक सहभागामुळे अहमदनगर विभाग राज्यात अग्रेसर ठेवतील असा विश्‍वास त्यानी व्यक्त केला. बी. नंदा. प्रवर अधीक्षक डाकघर अहमदनगर यांच्याद्वारे सर्व बाबीचा आढावा घेत,याही आर्थिक वर्षात आपल्या सर्वांच्या  अनमोल योगदानाने आपला विभाग निश्‍चित सर्व योजनेत आघाडीवर असेन अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी पुरस्कारप्राप्ती नितीन खेडकर, बहिरु नेब, वाल्मिक जाधव, ऋतिका कराळे, महेश तामटे, संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केडगाव पोस्ट ऑफिसच्या वतीने अल्पबचत योजनेत पश्‍चिम उपविभागात सर्वाधिक नवीन खाते उघडल्याबदल त्याचा विशेष गौरव करण्यात आला ,संतोष यादव शुभांगी मांडगे,प्रियांका भोपळे यांनी गौरव स्वीकारला. केडगाव पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत असणारे अकोळनेर शाखा डाकघराचे बाळासाहेब सोनवणे, भोरवाडीचे रमेश घुले यांनाही विशेष कार्यबदल सन्मानित करण्यात आले. यांचे सह विभागातील पुरस्कार प्राप्त कर्मचारी  वंदना नगरकर, तृप्ती जोशी, संजय कदम, अमोल साबळे, महेश तामटे, संतोष झावरे, प्रशांत खोडदे, दिलीप उनवणे, लक्ष्मण ढवळे, नितीन खेडकर,अनिल लोटके, बळवंत माने, प्रियांका वारुळे, बशीरभाई शेख, गौरी पवार रुपाली खेडकर, रमेश मगर, पिरमहंमद चौगुले, राजेंद्र कोल्हे, युवराज राऊत, नवनाथ शिंदे, यांचा  विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्कान शेख, प्रास्ताविक संदिप हदगल, तर आभारप्रदर्शन अक्षय शिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमास विभागातील अधिकारी बाळासाहेब बनकर, अमोल भूमकर, हनुमंत चव्हाण, पुरस्कार प्राप्त कर्मचारी, व मोठया संख्येने दोन्हीही उपविभागातील डाक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय कर्मचारी यांच्यासह संतोष घुले,ऋषीकेश कार्ले, शुभांगी अर्चना भुजबळ, रंजना कदम, कैलास माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

एप्रिल 23 ते मार्च 24 या कालावधीत अल्पबचतीची नवीन अकाउंट ओपनिंगमध्ये उल्लेखनीय काम केल्याबदल डाक विभागाच्या वतीने गौरवीत करण्यात आले यांचा विशेष आनंद आहे. यापुढे सतत पोस्टाच्या सर्व योजना लोकाभिमुख करण्यासाठी निश्‍चितच प्रयत्नशील राहू.
संतोष यादव, पोस्टमास्तर केडगाव (अहमदनगर आर एस)

COMMENTS