Homeताज्या बातम्यादेश

पावसामुळे केदारनाथ यात्रेला ब्रेक

बद्रीनाथ महामार्ग 17 तासानंतर झाला खुला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संपूर्ण देश मान्सूनने व्यापला असून, सर्वत्र जोरदार पाऊस होतांना दिसून येत आहे. या आठवडयात सर्वच राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट

हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर शाब्दिक हल्ला… म्हणाल्या, धनंजय मुंडे…

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संपूर्ण देश मान्सूनने व्यापला असून, सर्वत्र जोरदार पाऊस होतांना दिसून येत आहे. या आठवडयात सर्वच राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत असतांना, मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. भूस्खलनानंतर 17 तासांनी बद्रीनाथचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला आहे.
देशात सरासरीपेक्षा 13 टक्के कमी पाऊस झाला आहे. वायव्य राज्यांमध्ये सामान्यपेक्षा 40 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याच वेळी, दक्षिण भारतात सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये 40 हजारांहून अधिक लोक अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. गुरुवारी आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गुरुवारी छिंकाजवळ दरड कोसळली. त्यामुळे बद्रीनाथकडे जाणारा महामार्ग ठप्प झाला. येथे पर्यटक अडकून पडले आहेत. गुजरातच्या पंचमहालमध्ये मुसळधार पावसामुळे कारखान्याची भिंत कोसळली. या अपघातात 4 मुलांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तराखंड, आसाम, पश्‍चिम-पूर्व राजस्थान, पश्‍चिम-पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पूर्व-पश्‍चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र , किनारी कर्नाटक, केरळ, गोवा, सिक्कीम आणि अंदमान-निकोबार. या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: मुसळधार पाऊस झालेल्या सर्व राज्यांच्या काही भागात हलका पाऊसही पडेल. या व्यतिरिक्त हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल. या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील: छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS