Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडीएमसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर निलंबित

डोंबिवली / प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंब

भारतीय वंशाचे सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष
लातूरमध्ये महिला आयोगाच्या सुनावणीत 93 तक्रारींचा निपटारा
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केली निवृत्तीची घोषणा

डोंबिवली / प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. काही महिन्यांपूर्वी सदर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका फिरस्ता गरोदर महिलेला उपचारासाठी दाखल करून न घेता तिला अन्यत्र जाण्याची सूचना डॉ. महातेकर व अन्य कर्मचार्‍यांनी दिली होती.

याप्रकरणी चौकशी समितीने डॉ. महातेकर यांनी निष्काळजीपणाचा दाखविल्याचा ठपका ठेवला होता. अखेर पालिका प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केली आहे. कल्याण येथील स्कायवॉकवर एका फिरस्ता महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस व काही महिलांनी या महिलेला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.

मात्र, या महिलेला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी रोखून ठेवले होते. याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तुम्ही या महिलेला प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयात घेऊन जा, असे कर्मचारी सांगत होते.

या महिलेला तात्पुरते दाखल करून पहिले उपचार सुरू करा, अशी मागणी पोलीस करत होते. रुग्णालयात त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. महातेकर आणि इतर कर्मचार्‍यांनी फिरस्ती महिलेला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, सदर महिलेची रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूत झाली होती. सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती. प्रसूती कळा सुरू असलेल्या एका महिलेला दाखल करून घेण्यास पालिका रुग्णालयाने टाळाटाळा केल्याने सर्व स्तरातून पालिका अधिकार्‍यांवर टीका झाली होती. पालिकेने सुरवातीला महिलेला वसंत व्हॅली येथे जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. तसेच ती प्रसूत झाल्यानंतर तिला योग्य उपचार देण्यात आले होते. असे सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आ. राजू पाटील यांनी ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पालिकेने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने या प्रकरणात घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉ. महातेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता. चौकशी समितीने दिलेल्या निष्कर्षवर पालिका प्रशासनाने डॉ. महातेकर यांच्यावर निलंबिणाची कारवाई केली आहे. निलंबन काळात डॉ. महातेकर यांना दररोज पालिका मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS