काश्मीरमध्ये दोन कारवायांमध्ये 6 दहशतवादी ठार

Homeताज्या बातम्यादेश

काश्मीरमध्ये दोन कारवायांमध्ये 6 दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी 4 दहशतवाद्यांची

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
नवऱ्याने पत्नी सह दोन्ही मुलांची चाकू मारून हत्या व स्वतःची आत्महत्या | LOKNews24
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार : नवाब मलिक

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी 4 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यातील दोघे पाकिस्तानी आहेत. तर इतर दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासंदर्भात जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये सुऱक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी कुलगाम जिल्ह्यातील मिरहमा भागात ही चकमक झाली. यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मिरहमा भागात झालेल्या चकमकीत 2 स्थानिक दहशतवादी तर एकजण जैश ए मोहम्मदशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी होता. या परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू आहे. काश्मीरच्या खोर्‍यात सातत्यानं दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांना टार्गेट केलं जात आहे. यामुळे सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरात मोहीम उघडली आहे. अनंतनागमध्येही बुधवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता.

COMMENTS