नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ राष्ट्रपादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ’काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर ताशेरे ओढ
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ राष्ट्रपादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ’काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती अशा शब्दात त्यांनी चित्रपटावर संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याक संमेलनात पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. ’काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले. भाजपा देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची तारीफ केली होती त्यावरही पवारांनी आक्षेप नोंदवला. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेत होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झाले ते देशासाठी चांगले झाले नाही. त्या लोकांना इकडे यावे लागले ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झाले ते विसरून समाजात एकता कशी राहिल याचा विचार करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS