Homeताज्या बातम्यादेश

काश्मीर पैगंबराच्या अवमानावरून पेटले

सर्व महाविद्यालये 1 महिन्यासाठी बंद

श्रीनगर ः काश्मीर खोर्‍यामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून, प्रेषित पैगंबर यांच्या अवमानाच्या मुद्यावर काश्मीर खोरे सध्या पेटलेले आहे. या मुद्यावर

डॉ. बाबा आढाव यांना सॅल्यूट!
मुंबईत अग्नितांडव! मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग
पश्‍चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार

श्रीनगर ः काश्मीर खोर्‍यामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून, प्रेषित पैगंबर यांच्या अवमानाच्या मुद्यावर काश्मीर खोरे सध्या पेटलेले आहे. या मुद्यावरून राज्यात तणाव वाढला असल्याने खोर्‍यातील महाविद्यालये एक महिना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत सर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला ऑनलाईन वर्ग घेण्यास सांगण्यात आले आहे.
श्रीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देखील बंद ठेवण्यात आले आहे. येथील वसतिगृहेही बंद करण्यात आले आहेत. येथील एका विद्यार्थ्याने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. श्रीनगर येथे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विविध ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने देखील करण्यात येत आहेत. फुटीरतावादी या मोर्चे निदर्शनाचा फायदा घेऊ शकतात तसेच दंगली भडकावू शकतात. यामुळे समाज माध्यमांत कुणी पोस्ट टाकू नये असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान कुणाच्याही पोस्टवर कमेंट देखील करू नका. तसेच आलेले मेसेजेस पुढे पाठवू नका, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एनआयटी येथील एका विद्यार्थ्याने प्रेषित महंमद यांच्या विरोधात चुकीची पोस्ट टाकली होती. यावरून सर्व वादंग सुरू झाले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी एनआयटी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलसचिवांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई पुरेशी नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आरोपी विद्यार्थ्याला अटक करून त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की एनआयटीमध्ये हिवाळी सुट्टी आधीच जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय वसतिगृहात राहणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना खोल्या रिकाम्या करण्यास सांगितल्या आहेत.

COMMENTS