Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटक सरकार विधानसभेतून हटवणार सावरकरांची प्रतिमा ; भाजप आक्रमक

मुंबई :कर्नाटकाच्या सिद्धरामय्या सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उम

होर्डिंग दुर्घटनेतील बळींचा आकडा 17 वर
वंचितची आरक्षण बचाव यात्रेची घोषणा
मिचाँग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यात नुकसान

मुंबई :कर्नाटकाच्या सिद्धरामय्या सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतांना दिसून येत आहे. सन 2022 मध्ये बसवराज बोम्मई यांच्या सरकारने सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपने आक्रमक होत काँग्रेसवर टीका केली आहे.
या मुद्द्यावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट शेअर करत काँग्रेसवर टीका केली. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS