Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला

विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात सध्या अदानी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असतांनाच, दुसरीकडे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आले

बीडच्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या अध्यात्मिक वैभवात भर
मकर संक्रांती स्पेशल रेसिपी तिळगुळ लाडू
अटकेची कारवाई टाळण्यासाठी पूजा खेडकर पळाली

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात सध्या अदानी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असतांनाच, दुसरीकडे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यासाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
दक्षिणेतील एकमेव राज्यातील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे. या निवडणुकीसाठी 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. पहिल्यांदा मतदान करणार्‍यांची संख्या 2018 च्या तुलनेत 9.17 लाखांनी वाढलीय. 1 एप्रिल रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारली जाणार आहे. कर्नाटक विधानसभा 24 मे रोजी विसर्जित होणार आहे. दरम्यान 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्याआधीच काँग्रेसने त्यांच्या 124 उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये सिद्धरामय्या यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाच वर्षांनी ते पुन्हा घरच्या मतदारसंघात परतणार आहेत. सिद्धरामय्या हे 2008 आणि 2013 मध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून जिंकले होते. तर 2013 मध्ये मुख्यंमंत्री असताना ते याच मतदारसंघाचे प्रतिनिधी होते.

असा असेल निवडणूक कार्यक्रम  – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023, उमेदवारी अर्ज छाननी तारीख – 21 एप्रिल 2023, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – 24 एप्रिल 2023, मतदानाची तारीख -10 मे 2023, मतमोजणीची तारीख – 13 मे 2023

काँग्रेसची भिस्त सिद्धरामय्या यांच्यावर- कर्नाटक हा एकेकाळी काँगे्रसचा बालेकिल्ला होता. मात्र सध्या या राज्यावर भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपला शह देवून कर्नाटकात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी काँगे्रस प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची भिस्त माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आहे. ते मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. तसेच, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वजनदार नेते डीके शिवकुमार यांचेही नाव चर्चेत आहे. काँग्रेसने नुकतीच 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपची कसोटी – देशात दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्ता मिळवणार्‍या भाजपला अद्यापही दक्षिण भारतातील राज्यात शिरकाव करता आलेला नाही. कर्नाटक हा त्यास अपवाद आहे. त्यामुळे हे राज्य कोणत्याही परिस्थितीत टिकवणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. या निवडणुकीचा निकाल 2024 च्या लोकसभेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर भाजपची भिस्त आहे.

COMMENTS