Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्नाटक निवडणूक आणि लोकसभा !

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. १३ तारखेला निकाल लागतीलच. सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्रपक्ष हे कर्नाटकच्या राजकीय सत्तेवर

सत्ताधारी -विरोधक दोहोंच्या भूमिका निंदनीय !
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
सत्ताबदल की सरंजामदारीची मजबूती ?

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. १३ तारखेला निकाल लागतीलच. सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्रपक्ष हे कर्नाटकच्या राजकीय सत्तेवर आहेत. एकंदरीत पाहता २०१८ च्या निवडणुकीत कर्नाटक मध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते त्यामुळे ते सत्तेतही नव्हते. सुरुवातीला जे डी एस आणि काँग्रेस हे सत्तेवर होते. परंतु, भाजपाने आमदारांची फोडाफोडी करून कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली. तरीही २०२३ च्या निवडणुकीला सामोरे जाताना भारतीय जनता पक्ष केवळ धर्माचा आधार घेऊन निवडणूक प्रचार करण्यात गुंतला आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने अतिशय मूलभूत मुद्दे मतदारांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या एकूणच नकारात्मक सत्ताकारणाला उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेसने २०० युनिट पर्यंत प्रत्येक घराला वीज मोफत, युवकांना बेरोजगार भत्ता, महिलांना मोफत बस प्रवास, दारिद्रय रेषेखालील प्रत्येक घराला दहा किलो मोफत तांदूळ आणि स्त्री कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबाला दरमहा दोन हजार रुपये भत्ता, अशी पाच आश्वासने  देण्यात आले आहेत. काँग्रेसकडून दिलेल्या या आश्वासनांची गृह ज्योती, गृहलक्ष्मी, आण्णाभाग्य, युवानिधी आणि महिलांना राज्य परिवहनाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास असणारी शक्ती अशा एकूण पाच योजना त्यांनी आपल्या निवडणूक अजेंड्यात जाहीर केलेल्या आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार आघाडीत थेट देशाचे पंतप्रधान प्रचारांमध्ये येऊनही केवळ धर्मावलंबी प्रचार आणि भाषणे, त्याचप्रमाणे आव्हाने करूनच ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दक्षिण भारतीय मतदार हा नेहमी वस्तुनिष्ठ विचार करतो. त्यामुळे काँग्रेसने त्यांना थेट वस्तूंचे आणि पैशांचे आकर्षण दाखवले आहे. सर्वच राजकीय तज्ञ, सर्वेक्षण आणि एकूणच देशभरात कर्नाटकात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल, असे भाष्य केले जात आहे.  या निवडणुकीत काँग्रेसला दीडशे जागा अपेक्षित आहेत. पूर्ण बहुमताची सत्ता घेण्यासाठी त्यांचा हा आटापिटा आहे. मात्र, काँग्रेसची खरी कसरत ही निवडणुकीनंतर सुरू होईल. कारण, काँग्रेस अंतर्गत किमान तीन राजकीय नेत्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्यातील जनमानसात अधिक रुजलेले संघटक नेते म्हणून मान्यता पावलेले सिद्धरामय्या यांना काँग्रेस मधून मुख्यमंत्री केले जाईल, याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी डी के कुमार यांनाही मुख्यमंत्री पदाची आस आहे. सिद्धरामय्या आणि डिके कुमार या दोघांमध्ये जर तुलना केली तर सिद्धरामय्या हे कर्नाटकाच्या जनतेत लोकप्रिय आहेत तर डी के कुमार हे कर्नाटकाच्या राजकारणातील बाहुबली आहेत. पण मुख्यमंत्री पदावरून जर या दोन्ही नेत्यांचे एकमत झाले नाही किंवा यामुळे काँग्रेस अंतर्गत अधिक विरोध निर्माण होण्याची परिस्थिती जर आली, तर, अशावेळी तिसरे व्यक्तिमत्व म्हणून थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचीही वर्णी मुख्यमंत्रीपदावर लागू शकते. अर्थात या जर तर च्या बाबी झाल्या; परंतु, कर्नाटकाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांचे दोन महत्त्वाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा याजबरोबर पक्षाध्यक्ष नड्डा या तीन स्टार कॅम्पेन नेतृत्व व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही या निवडणुकीत तोडीस तोड लढत देता येणार आहे, अशी चिन्ह मात्र दिसत आहे. एकमात्र, खरे आहे की, या निवडणुकीत जो पक्ष निवडून येईल, त्याचे पारडे लोकसभा निवडणुकीत जड ठरेल!

COMMENTS