इस्लामपूर / प्रतिनिधी : बेंगलोर जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला किरकोळ म्हणणारे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज ब

इस्लामपूर / प्रतिनिधी : बेंगलोर जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला किरकोळ म्हणणारे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध तसेच पुतळा विटंबना सारख्या घटनांना संरक्षण देणार्या भाजप आणि कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहे. प्रत्येक देशवासीयांचा आदर्श आहेत. पुतळा विटंबना हा प्रकार देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणार आहे. या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पहावे व दोषींवर कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शाकीर तांबोळी यांनी केले आहे.
COMMENTS