कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा न बनवताच खर्च केले कोट्यावधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा न बनवताच खर्च केले कोट्यावधी

कर्जत/प्रतिनिधी : शासनाने विकासाचे धोरण राबविताना विकास आराखड्यावर भर दिला असून त्या अनुषंगाने प्रत्येक गावाचा पाच वर्षांचा व एक वर्षाचा ग्राम विकास

म.गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे
जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट
संजीवनीच्या विकासात कर्मचार्‍यांचा मौलिक सहभाग – बिपीनदादा कोल्हे

कर्जत/प्रतिनिधी : शासनाने विकासाचे धोरण राबविताना विकास आराखड्यावर भर दिला असून त्या अनुषंगाने प्रत्येक गावाचा पाच वर्षांचा व एक वर्षाचा ग्राम विकास आराखडा तयार करून त्यानुसारच विविध विकास कामे करावीत असे आदेश दिले आहेत, मात्र कर्जत नगर पंचायतीने गेली पाच वर्षात शहर विकास आराखडाच केला नसल्याचे निदर्शनास येत असून बिना आरखड्याचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यास तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी कशी दिली असा प्रश्न आशिष बोरा यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांच्यापुढे उपस्थित केला आहे. 
गेली सत्तर वर्षांपासून विकासावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे, मात्र अद्यापही सर्वसामान्य जनता विकासाबाबत समाधानी नाही. त्यामुळे याबाबत शासनस्तरावर विचारमंथन होऊन प्रत्येक गावाने आगामी काळाचा ग्राम विकास आराखडा करावा, हा ग्राम विकास आराखडा तयार करण्यासाठी लोक सहभाग घ्यावा व त्यातुन प्रत्येक वर्षांचा स्वतंत्र व एकत्रित पाच वर्षांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात करावा असे आदेश दिले आहे, याअनुषंगाने कर्जत तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर आमचा गाव आमचा विकास अंतर्गत विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहेत. गाव पातळीवर ही प्रक्रिया सुरू असताना शहरासाठी कोणते नियम आहेत व  कर्जत नगर पंचायतने विकास आराखडा कसा केला आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न भारतीय जनसंसदचे तालुकाध्यक्ष आशिष बोरा यांनी केला असता कर्जत नगर पंचायतने गेली पाच वर्षात शहर विकास आराखडाच तयार केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2016 रोजी राज्यात नव्याने स्थापन केलेल्या 18 नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी 70 कोटी 87 लाख 50 हजार निधी मंजूर केला होता, सदर निधी मधील पाच कोटी रुपये कर्जत नगरपंचायतीस मंजूर करण्यात आले होते, यापैकी पाच लाख रुपयाचा निधी शहर विकास आराखडा बनविण्यासाठी खर्च करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी द्यायची होती, यानंतर संबंधित नगरपंचायतीनी शहर विकास आराखडा बनवून या आराखड्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित निधी संबंधित नगरपंचायतीस खर्च करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी द्यावी, असे या आदेशात म्हटले होते. याच आदेशात जिल्हाधिकारी यांच्या जबाबदारी ही दिल्या असून त्यात म्हटले आहे, या प्रकल्पाअंतर्गतची कामे संबंधित शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांची आहे.
 कर्जत नगर पंचायतीने शहर विकास आराखडा बनवला आहे की नाही याबाबत लेखी पत्रातून माहिती विचारली असता नगर पंचायतीच्या वतीने आतापर्यत शहर विकास आराखडाच तयार केलेला नाही असे कळवले आहे. जर कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा बनवलेला नसेल तर तात्कालीन जिल्हाधिकारी यांनी नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी मंजूर पाच कोटी निधी खर्च करण्यास मंजुरी कशी दिली व का दिली असा प्रश्न बोरा यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे, याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन देत याची चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कारवाई करण्याची ही मागणी केली आहे.

नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर विकास आराखडा तयार करणे अपेक्षित होते. मात्र तो केल्याचे आढळत नाही. सध्या कर्जत नगर पंचायतने शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतलेले असून अनुभवी संस्थेकडून लवकरच शहर विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
गोविंद जाधव, मुख्याधि
कारी

COMMENTS