Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी – आमदार रोहित पवार

निविदा प्रक्रिया राबवण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता

जामखेड/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर स्थगिती देण्यात आलेल्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने मुख्यमंत्री आण

विकासकामांच्या जोरावर डॉ. सुजय विखे बाजी मारतील ः वसंत लोढा
पुणतांबा-कोपरगाव आणि शिर्डी रस्त्यावरील अतिक्रमण काढावीत
पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात पुणतांब्यात आंदोलन

जामखेड/प्रतिनिधी ः राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर स्थगिती देण्यात आलेल्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात 6.37 कोटी रुपयांचे सीसीटीव्ही लावण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यास उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी विधानसभेत केली.
वाहतुकीचा भंग करणे, चोरी, महिला आणि मुलींची छेडछाड यासह इतर गुन्ह्यांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्याचीही विनंती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 5 डिसेंबर 2022 रोजी केली होती. त्यानुसार 22 जुलै 2022 रोजी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निश्‍चित करण्यात आले.  त्यानंतर 22 सप्टेंबर 2022 मध्ये या प्रस्तावासंदर्भात अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या वायरलेस विभागाकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार कर्जत-जामखेडमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आणि त्यासाठी निधीही दिला होता. आता लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल अन् जामखेड कर्जत शहर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नजरेत येईल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा पवारांचे मानले आभार
मतदारसंघात सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी सुरक्षित रहावेत, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कर्जत व जामखेड शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. मविआ सरकारने हा प्रस्ताव मंजूर करून निधीही दिला होता. परंतु या सरकारने निविदा प्रक्रिया राबवण्यास त्याला स्थगिती दिली होती. ती उठवण्याची विनंती मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना केली होती. तसेच अजितदादा यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत मतदारसंघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजितदादा तसेच सर्व अधिकारी यांचे आभार मानतो.असे आ. रोहित पवार यांनी सांगितले

COMMENTS