Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजीचा वेदांत सोनवणे एम.बी.बी.एस परीक्षेत उत्तीर्ण

कोपरगाव शहर ः गेल्या 20 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील करंजी या खेडेगावात आपली वैद्यकीय सेवा देत आसलेले डॉ विकास सोनवणे यांचा वेदांत या मुलाने ए

LokNews24 l राज्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?
वाळू डेपो विरोधात. आ.गडाख ग्रामस्थांसह मैदानात
जायकवाडीला पाणी सोडणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

कोपरगाव शहर ः गेल्या 20 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील करंजी या खेडेगावात आपली वैद्यकीय सेवा देत आसलेले डॉ विकास सोनवणे यांचा वेदांत या मुलाने एम.बी.बी.एस या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण पूर्ण करत करंजी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकताच एम.बी.बी.एस झालेल्या वेदांत सोनवणे चे वैद्यकीय शिक्षम पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मादाय हॉस्पिटल येथे झाले असून त्याला या साठी एस.के.एन मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. ए. व्ही. भोरे, डॉ.नाईक , डॉ. पुरंदरे ,डॉ. दामले आदींनी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.तर त्याचा या यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव व येवला तसेच करंजी-उंदीरवाडी-ओगदी आदी गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS