कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाच्या खोल्याचे कर्मवीर शंकरराव

कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयाच्या खोल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सह. साखर कारखान्याच्या माध्यमातून बांधलेल्या 7 वर्ग खोल्यांचे पत्रे बदलण्याचे कामकाज रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी मंजुर केलेल्या 7 लाख रुपये निधीतुन नुकतेच कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय कारभारी आगवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक माळी, करंजी गावचे उपसरपंच शिवाजी जाधव, सुनील आगवन, अंबादास आगवन, संतोष आगवन, सरोदे सर आदीच्या उपस्थित सुरू झाले.
याप्रसंगी संजय आगवन यांनी बोलताना सांगितले की, सुमारे 40 वर्षांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते त्यामुळे आपल्याला शिक्षण घेताना जो त्रास झाला तो येणार्या पिढीतील विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून त्या काळाचे करंजी गावचे पूर्व भागातील उभारते नेतृत्व कारभारीनाना आगवन यांनी तत्कालीन खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या मोलाचा मदतीने व मार्गदशनाने तसेच काही शिक्षण प्रेमी नागरिकांच्या सहकार्यांने 1989 साली रयत शिक्षण संस्थेची मान्यता घेत करंजी गावातील वेगवेगळ्या मंदिरामध्ये विनाअनुदानित तत्वावर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करत करंजी व परिसरातील मुला-मुलींना शिक्षणाची दारे खुली करत उच्चशिक्षित शिक्षक नेमत शाळेसाठी आवश्यक असणार्या भौतिक सुविधाची उणीव देखील माजी खासदार शंकरराव काळे यांच्या अथक योगदानातून कोळपेवाडी कारखान्याच्या सहकार्याने तसेच शिक्षण प्रेमी नागरिकांच्या साहाय्याने भासू न देता कधीच विद्यार्थ्यांचा शिक्षणात खंड पडू न देता वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करत माजी खासदार काळे व काळे कारखान्याच्या सहकार्याने शाळेसाठी प्रशस्त जागा घेत कारखान्याच्या मदतीने त्या जागेवर वर्गखोल्या उभारून त्या खोल्या मध्ये शाळा भरण्यास सुरुवात करत शाळा उभारणीत माजी खासदार कर्मवीर काळे साहेबांचे योगदान सदैव स्मरणात राहावे म्हणून शाळेचे नामकरण कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय असे करत गावातच 11 वी व 12 वी चे वर्ग सुरू व्हावेत या उद्देशाने माजी आमदार अशोक काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून व 42 लाख रुपयाची इमारत उभारत शाळेतील मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तार कंपाऊंड, प्रशस्त प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, संगणक, सांस्कृतिक कार्यक्रमास स्टेज यासारख्या विविध भौतिक सुविधा काळे कारखान्याच्या सहकार्यातून पूर्ण करून घेतल्या. रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाचा उभारणीत मोलाचे योगदान कारभारी आगवन यांचे असल्यामूळ माजी खासदार शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी तसेच समन्वय समिती सदस्य पदी संस्थेने नेमणूक करत जणू त्यांचा कामाची पोहच पावतीच दिली. शाळेची कोणतीही जाहिरात अथवा बडेजाव न करता वाढत चाललेली व्याप्ती आज रोजी शाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगाच्या कानाकोपर्यात आपले, शाळेचे व गावाचे नाव अभिमानाने उंचावत असल्याने ही गावासाठी अभिमानाची बाब असून त्यामुळे येणार्या काळात आपल्याच गावात उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 11 वी व 12 वी सुरू व्हावी ही नानांची इच्छा आपण सर्व मिळून पूर्ण करू असा मानस संजय आगवन यांनी या प्रसंगी बोलतांना व्यक्त केला.
COMMENTS