Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका

मोठ्या संख्येने झाड पडली उन्मळून

Oplus_131072 कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील संपूर्ण करंजी परिसराला गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक आलेल्या मुसळधार पावसासह वादळी

एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल
12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
मनपात आता 67 विरुद्ध0 …विरोधक कोणी देता का?
Oplus_131072

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील संपूर्ण करंजी परिसराला गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक आलेल्या मुसळधार पावसासह वादळी वारा व गारांचा मोठ्या फटका बसल्याने नैसर्गिक मोठे नुकसान झाले असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस सुरू असल्याने अनेकांचे नुकसान होत असून त्याचाच प्रत्येक कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरासह आसपासच्या गावांना गुरुवार 16 मे रोजी आला असून अचानक आलेल्या मुसळधार पावसासह शेंगदाण्या इतक्या आकाराच्या गारां व सोसाट्याचा वार्‍याने परिसरात मोठी हानी झाली आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या मुसळधार पावसासह असलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने मोठ्या प्रमाणात परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने जिकडे तिकडे जमीनोधस्त झालेली झाडेच बघायला मिळत होती .अनेकांच्या पत्र्याच्या शेडवर देखील झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले पण मिळालेल्या माहितीनुसार कुठेही जीवित हानी झाली नाही तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा करणार्‍या तारा तुटून पडल्या होत्या तसेच अनेकांच्या आंब्याच्या झाडाखाली आंब्यांचा व कैर्‍यांचा खच पहावयास मिळत होता. सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता करंजी गावचे सरपंच रवींद्र आगवण व उपसरपंच शिवाजी जाधव यांनी तातडीने प्रशासनासोबत संपर्क साधून परिस्थितीची पाहणी करत पंचनामा करण्याची विनंती केली तर अनेक ठिकाणी पडलेले झाडे जेसीबी च्या साहाय्याने बाजूला करत रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत होते. तर महावितरण चे कर्मचारी देखील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते तसेच करंजी गावचे तलाठी सतीश गायके व कर्मचारी कनिफ आहेर हे प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पाहणी करत तातडीने पंचनामे करत होते.

तीन किलोमीटरचा रस्ता झाला ब्लॉक – करंजी ते नऊ चारी या तीन किलोमीटरचा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने वनविभागाने चुकीच्या पद्धतीने लावलेली झाडे उन्मळून पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता त्यामुळे अनेक  वाहन चालकांना मोठी कसरत वाहन चालविताना करावी लागत होती.

COMMENTS