Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘कपिल शर्मा’चा नवा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या आगामी ‘झ्वि

बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ
आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले
राहुरी पालिका अभ्यासिकेतील दोघाची शासकीय सेवेत निवड

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या आगामी ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले आहे. या चित्रपटातील कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात कपिल शर्माची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे. लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल शर्मा या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो आयुष्यातील अनेक संकटांना तोंड देताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. मजबूर है इसिलिय मजदूर है… हा कपिल शर्माचा या ट्रेलरमधील डायलॉग खूप काही सांगून जातो.

COMMENTS