अंबाजोगाई प्रतिनिधी - परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा नेते कमलाकर अनंतराव बावणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी तेलं
अंबाजोगाई प्रतिनिधी – परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा नेते कमलाकर अनंतराव बावणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हैदराबाद येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भारतीय राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षा कडे बीड जिल्ह्यातील प्रामुख्याने परळी मतदार संघातील युवकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे.एक जिद्दी माणूस राज्याच्या विकास मध्ये काय परिवर्तन आणू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आहेत. तेलंगणा राज्यात शेतकरी, सामान्य नागरिकासाठी केलेले त्यांचे कार्य व कार्यपद्धतीने बी आर एस पक्ष आता महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात उडी घेत आहे. या पक्षात अनेक आजी माजी आमदार खासदार युवा नेत्याचा राज्यातील प्रस्तापित पक्षाना बगल देत प्रवेश होत आहेत. बी आर एस पक्षाला माधव आप्पा जाधव यांच्या रूपात परळी मतदारसंघात दमदार उमेदवार भेटला आहे त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर या पक्षाकडे मतदारसंघातील युवकांचा वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर काम करणारे कमलाकर अनंतराव बावणे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते दत्ता साळुंखे, संदीप गाढवे, अमर साळुंखे, बाळासाहेब जाधव, अविनाश इनामे, आदित्य साळुंखे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हैदराबाद येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भारत राष्ट्र समिती इठड पक्षा मध्ये पक्षप्रवेश केला. बी आर एस पक्षामध्ये परळी मतदार संघातील अनेक तरुणांचा लवकरच प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.पेशाने इंजिनियर व आयटी कंपनीचे संचालक असलेले कमलाकर आनंतराव बावणे यांच्यावर बी आर एस पक्षा कडून घाटनांदुर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.युवकांत दांडगा जनसंपर्क असणारे कमलाकर बावणे यांच्या पक्षप्रवेशाने बी आर एस पक्षाला परळी मतदार संघात बळकटी मिळेल.दरम्यान कमलाकर बावणे यांनी बी आर एस पक्षात प्रवेश करताच घाटनांदुर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून मित्रमंडळी कडून स्वागत होत आहे.
COMMENTS