Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामरगाव प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर प्रतिनिधी : तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथ

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे गरिबाला मिळाला निवारा
स्वातंत्र्यदिनी मुळा धरण तिरंगा छटांनी भिजले
लिफ्ट मागून वाहनचालकांना लुटणार्‍या महिलेस पकडले

अहमदनगर प्रतिनिधी : तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
       मान्यवरांच्या हस्ते सरस्वस्ती पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अतिथींसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसिलदार संजय शिंदे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कडून शाळेस देण्यात आलेल्या पाच एल. ई.डी. स्क्रीनचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत विदयार्थ्याना भौतिक व डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल  आनंद व्यक्त करत इतर माध्यमांच्या शाळेच्या तोडीस तोड शाळा असल्याचे मत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरचे तहसिलदार संजय शिंदे यांनी कामरगाव शाळेतील विदयार्थ्याची गुणवत्ता व कलागुणांच कौतुक करत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण आवश्यक असल्याच मनोगत व्यक्त करत शाळेच्या पट संख्येबाबत व सुविधांबाबत कौतुक केले. तसेच दोन्ही उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  पत्रकार हेमंत साठे व शालेय व्यवस्थापन समितीच्या कामाचे देखील कौतुक केले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली. विविध ऐतिहासिक व आधुनिक  गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कलागुणांना वाव मिळतो. या विचारांना अनुसरून हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच तुकाराम कातोरे, उपसरपंच पूजा संदिप लष्करे, ग्रा.पं. सदस्य गणेश साठे, लक्ष्मण अण्णा ठोकळ, हाबू शिंदे, संदिप ढवळे, सोसायटी चेअरमन सुनिल चौधरी, राजू राजगुरु संचालक मंगल ठोकळ, उद्योजक मनोज ठोकळ, ग्रामसेवक सुरेश मगर, तलाठी हर्षल करपे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य. अश्‍विनी ठोकळ, उप सरपंच अनिल आंधळे, सतिष, कातोरे, प्रशांत साठे, डॉ. संदीप पवार, मुख्याध्यापिका भारती झावरे, शिक्षिका मंदाकिनी दावभट, शुभांगी क्षीरसागर, नंदा पठारे, लक्ष्मी गायकवाड, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शेरकर यांनी केले.

COMMENTS